बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट बराच गाजतोय. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रदर्शनाआधीही सोशल मीडियावर बराच चर्चेत होता. या चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सुरू करण्यात आला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली अन् बॉक्स ऑफिसवरील आर्थिक गणित देखील कोलमडलं. त्यानंतर आतापर्यंत यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता राजकीय मंडळींची देखील यामध्ये भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – हिंदी चित्रपटांचे शो रद्द तर मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी, काही दिवसांमध्येच कमावले इतके कोटी

‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ बाबत याआधी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आपलं मत मांडलं होतं. आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. पण हे ट्वीट करत असताना त्यांनी एक मोठी चूक केली. जितेंद्र आव्हाड यांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी लगेचच ट्वीट डिलीट केलं.

“भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या ‘काश्मीर फाईल्स’पेक्षा, त्यांनी बहिष्कार घातलेल्या ‘लालसिंग चढ्ढा’ने जास्त पैसा कमावला. ७.५ दशलक्ष डॉलर्स, म्हणजे साधारण ६००० कोटी रुपये! भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. हॅशटॅग फेक बॉयकॉट.” असं ट्वीट त्यांनी केलं.

आणखी वाचा – तब्बल १५ दिवसांनंतर शुद्धीवर आले राजू श्रीवास्तव, प्रकृतीविषयी नवी माहिती समोर

पण ७.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६००० कोटी रुपये नव्हे तर ६० कोटी रुपये होतात. जितेंद्र आव्हाड यांना ही चूक महागात पडली. त्यांच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करत राग व्यक्त केला. त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. पण या माध्यमातून जितेद्र आव्हाड यांनी ‘लाल सिंग चड्ढा’ला पाठिंबा दिला. पण त्याचबरोबरीने त्यांनी ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचाही यामध्ये उल्लेख केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad tweet on aamir khan lal singh chaddha movie and he badly trolled for mistake on twitter see details kmd
First published on: 25-08-2022 at 13:52 IST